काँग्रेसची तटबंदी, सेनेत प्रवेश करणार्‍यांवर बंदीची कारवाई

July 21, 2014 5:39 PM0 commentsViews: 5170

24thane_congress21 जुलै : काँग्रेसचे नेते नारायण राणे यांचे समर्थक रवींद्र फाटक यांनी अलीकडेच शिवसेनेत प्रवेश केला त्यांच्यासोबत काँग्रेसच्या इतर सात नगरसेवकही काँग्रेसमध्ये दाखल झाले. पण या सात नगरसेवकांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई होणार आहे.

ठाण्याचे काँग्रेस अध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर यांनी याविषयीची माहिती दिलीय. काँग्रेसचे आणखी 12 नगरसेवक नजरकैदेत असल्याचं समजतंय. आज (सोमवारी) ठाण्यातील पालिका काँग्रेस कार्यालयात बाळकृष्ण पुर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या 11 नगरसेवकांची बैठक घेण्यात आली.

सेनेत काही नगरसेवक प्रवेश करणार असल्याची कुणकुण काँग्रेसला लागल्यामुळे बैठक घेतली आणि या पुढे कोणीही प्रवेश करू नये या करिता पक्षांतर्गत बंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार असल्याच पुर्णेकर यांनी सांगितलंय.

आज संध्याकाळी उध्दव ठाकरेंच्या ठाण्यातील सभेत हे नगरसेवक प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर या नगरसेवकांवर कारवाई होणार आहे. परंतु या बाबत पुर्णेकर यांना विचारले असता त्यांनी नगरसेवकांची बैठक असल्याचं सांगितलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close