…तर राणेंच्या प्रवेशाचा विचार करू -फडणवीस

July 21, 2014 6:25 PM1 commentViews: 8854

fadanvis_on_rane21 जुलै : नारायण राणे भाजपमध्ये येणार असा कोणताही प्रस्ताव त्यांनी दिलेला नाही पण जर असा काही प्रस्ताव आला तर शिवसेनेशी चर्चा करून निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आमची युती जरी असली तरी भाजप हा वेगळा पक्ष आहे आम्ही निर्णय घेतला तर आम्हाला कुणी रोखू शकत नाही. आमच्यावर कुणाचा दबाव नाही असंही फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं. पण आमची युती वैचारिक आहे आम्ही युतीचा धर्म पाळू अशी सारवासारवही फडणवीस यांनी केली.

काँग्रेसचे नेते नारायण राणे मंत्रिपदाचा राजीनाम्याची घोषणा केली. राणेंची ही पहिली घोषणा नव्हती पण राणे भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी राजीनामा देत असल्याची चर्चा सुरू झाली होती. विशेष म्हणजे राणेंनी राजीनाम्याची घोषणा करताच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपने राणेंना प्रवेश देऊ नये असा सल्ला दिला होता. भाजपच्या नेत्यांनीही राणेंना भाजपमध्ये घेणार नाही असं सांगून युतीचा धर्म पाळणार अशी ग्वाही दिली. आज ठरल्याप्रमाणे राणेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी या प्रतिक्रिया देताना वेगळेच संकेत दिले.

राणेंनी काँग्रेसमध्ये जायला नको हवं होतं. आता त्यांनी राजीनामा दिलाय पण आपण काँग्रेसमध्ये राहणार असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे ते भाजपमध्ये येतील असा कोणताही प्रस्ताव नाही. भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याशीही कोणताही संपर्क साधलेला नाही असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. गेल्या नऊ वर्षात खूप पाणी वाहुन गेलंय. आता राणे भाजपमध्ये येणार असल्याची चर्चा जरी असली तरी असा कोणताही प्रस्ताव नाहीच पण जर असा प्रस्ताव आला तर आम्ही विचार करू यासाठी शिवसेनेला विचारात घेतलं जाईल पण युती जरी असली तर आमचा पक्ष वेगळा आहे आमच्यावर कुणाचा दबाव नाही आम्ही जर निर्णय घेतला तर कुणीही रोखू शकत नाही असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसंच आम्ही फिल्टर लावून दारं मोकळी ठेवली आहेत अशी सावध प्रतिक्रियाही फडणवीस यांनी दिलीये.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Pradipvasant Pawar

    shatru mitrachya barobar gela tar sahajikach konalahi tyache vait vatnarach!

close