मोनिका कॉलेजला परतली

July 21, 2014 10:33 PM1 commentViews: 6708

21 जुलै : रेल्वे अपघातात आपले दोन्ही हात गमावलेली मोनिका मोरे आज 6 महिन्यांनंतर कॉलेजला परतली. ती घाटकोपरच्या एसएनडीटी कॉलेजमध्ये 12 वीच्या कॉमर्स शाखेमध्ये शिक्षण घेते. मोनिकाला कृत्रिम हात बसवण्यात आले आहेत. ती आज कॉलेजला येताच शिक्षक आणि मैत्रिणींनी तिचं प्रचंड उत्साहात स्वागत केलं. काही महिन्यांपूर्वी घाटकोपर स्टेशनवर झालेल्या अपघातात मोनिकाचे दोन्ही हात ट्रेनखाली आले होते. गेले काही दिवस मोनिका कृत्रिम हात वापरण्याचा सराव करत होती. या अपघातातून सावरल्यानंतर मोनिका आपल्या कॉलेजला परतली. तिच्या धाडसा आयबीएन लोकमतचा सलाम..
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Web Pic

    Great

close