दुर्गा झाली गौरी अजूनही हाऊसफुल

April 28, 2009 3:17 PM0 commentsViews: 3

28 एप्रिलमाधुरी निकुंभछोट्या आणि मोठ्या कलाकारांच्या ताफ्यासोबत मस्त म्युझिक आणि डान्स हे गणित जुळून येतं ते दुर्गा झाली गौरी या नाटकात. अनेक वर्षांपासून चाललेलं हे नाटक दरवर्षी सुट्‌ट्यांमध्ये नव्या जोमाने नव्या प्रेक्षकांसाठी उभं राहतं.1982 ला या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. उर्मिला मातोंडकर, सुकन्या कुलकर्णी अशा अनेक अभिनेत्री या नाटकाशी जोडल्या गेल्या आहेत. अदिती मिरवणकर ही अभिनेत्री गेली 14 वर्षं या नाटकात काम करत आहे. आजही ती हे नाटक एंजॉय करतेय. अमेरिकावारी केलेलं हे नाटक बालप्रेक्षकांमध्ये भलतंच लोकप्रिय आहे. आजवर अनेक पिढ्यांनी लहानपणापासून हे नाटक पाहिलंय. अजूनही हे नाटक हाऊसफुलच असतं हीच याची खासियत आहे.

close