नारायण राणे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

July 22, 2014 11:16 AM0 commentsViews: 1037

123rane_on_cm

22  जुलै :   नारायण राणे यांनी काल मंत्रिपदाचा राजीनामा ‘ना’राजीनाट्यनंतर आज राजकीय घडामोडींना आणखी वेग येत आहे. नारायण राणे आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यात वर्षा बंगल्यावर एकत्रित बैठक होत आहे. या भेटीदरम्यान राणेंची समजूत काढून, समेट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, राणेंनी राजीनामा दिल्यानंतर माणिकराव ठाकरेंनी काल राणेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की राणेंच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील पण आतापर्यंत त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. आम्ही राणेंना भेटून त्यांचे विषय आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि अपेक्षा अशी आहे की या भेटीतून काही चांगलं निघेल. नारायण राणेंचा राजीनामा स्वीकारायचा का नाही हा निर्णय मुख्यमंत्री घेतील असं माणिकराव ठाकरे यांनी कालच स्पष्ट केलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close