गडचिरोलीत 100 गावं संपर्कहीन

July 22, 2014 3:34 PM0 commentsViews: 225

22  जुलै :   गडचिरोली जिल्ह्यात शनिवारपासून पडणार्‍या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या दुथडी वाहत आहेत. पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे भामरागड तालुक्याचा संपर्क तुटलाय. 100 गावं संपर्कहीन झालीयेत. सर्वाधिक पाऊस गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात भामरागड, सिरोंचा, अहेरी, एटापल्ली या तालुक्यांमध्ये पडलाय. पर्लकोटा नदीच्या पुलावर 2 फुटांपेक्षा जास्त पाणी वाहतंय. या पावसामुळे शेतकर्‍यांना मात्र दिलासा मिळालाय. जिल्ह्यात आतापर्यंत 3 हजार 602 मिमी पाऊस झालाय. अनेक नद्याही दुथडी वाहताहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close