मनसेला पाठिंबा दिल्याप्रकरणी कोरेंना मुख्यमंत्र्यांची चपराक

April 28, 2009 6:06 PM0 commentsViews: 29

28 एप्रिल मनेसला पाठिंबा द्यायचा असेल तर सरकारमधून बाहेर पडावं, असा इशारा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विनय कोरेंना दिला आहे. विनय कोरे हे अपारंपारिक उर्जा मंत्री आहेत. विनय कोरे यांनी नुकताच दक्षिण मुंबईतील मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकरयांना पाठिंबा जाहीर केला. तसंच या मतदारसंघातील कोल्हापूरकरांनी मनसेला मतदान करावं, असं आवाहनही त्यांनी केलंय. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर शंका घेत अशोक चव्हाण यांनी पक्षामधून बाहेर पडावं, असा निर्णय दिला आहे. जनसुराज्य पार्टीचे प्रमुख असणारे विनय कोरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून मंत्री झाले आहेत.

close