असाही काकस्पर्श, ‘त्याच्या’वर रोज कावळे हल्ला चढवता !

July 22, 2014 3:29 PM0 commentsViews: 6783

22 जुलै : श्वान मागे लागणं हे नेहमीच झालं पण एक कावळा तुमच्या मागे लागला हे ऐकून कुणालाही हसू येईल पण असं झालंय. नागपूरच्या सावित्रीबाई फुले नगरमध्ये राजू मेश्राम या व्यक्तीला दोन कावळे गेल्या 20 दिवसांपासून त्रास देत आहे.या मागचं कारण काय हे शोधण्यात येतंय. राजू मेश्राम हे जेव्हा घराबाहेर पडतात तेव्हा हे दोन कावळे त्यांच्या मागे येतात आणि त्यांच्य डोक्यावर चोचीने हल्ला करतात. मेश्राम यांच्या मागे चार किलोमिटरपर्यंत हे दोन कावळे पाठलाग करतात. पण पक्षीमित्रांच्या मते राजू मेश्राम यांनी कळत नकळत कावळ्यांना काही त्रास दिला असेल त्यामुळे ते त्यांना त्रास देत असतील. या संदर्भात वनविभागाकडेही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close