विरोधी पक्षनेतेपद द्याच!, काँग्रेसची सभापतींना विनंती

July 22, 2014 8:43 PM0 commentsViews: 901

 a01sonia_gandhi22 जुलै : संसदेत विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा अजूनही कायम आहे. काँग्रेसने आपल्या विरोधी पक्षनेतेपद मिळावं यासाठी आता सभापतींना विनंती केली आहे. सभागृहात विरोधी पक्षनेता नसणं ही सभापतींसाठी लाजीरवाणी बाब असल्याचं सांगत काँग्रेस विरोधी पक्षनेते पदासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केलाय.

मात्र याविषयी कुठलंही मत व्यक्त करणार नाही असं सभापतींनी स्पष्ट केलंय. सध्या केंद्रीय दक्षता आयुक्तांच्या नियुक्तीचा विचार करत आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये अधिक संतापाचं वातावरण निर्माण झालंय.

नियमांनुसार, पंतप्रधान, गृहमंत्री आणि विरोधी पक्षनेते केंद्रीय दक्षता आयुक्तांच्या नियुक्तीबद्दल निर्णय घेतात. पण पर्सोनेल आणि ट्रेनिंग विभागाने कॅबिनेट सचिवांना आणि इतर सचिवांना यासंदर्भात सूचना करायला सांगितलंय. सध्याचे केंद्रीय दक्षता आयुक्त प्रदीप कुमार आणि दक्षताय आयुक्त जे एम गर्ग यांचा कार्यकाळ सप्टेंबरमध्ये संपतोय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close