बळीराजा हतबल, आम्हाला इच्छामरण द्या !

July 22, 2014 9:10 PM0 commentsViews: 1174

nasik farmar422 जुलै : मागील वर्षी दुष्काळातून कसाबसा सावरलेला बळीराजा यंदाही हवालदिल झाला. पावसाने जुलैच्या अखेरीस जोरदार हजेरी जरी लावली असली तरी शेतकर्‍यांची चिंता अजून दूर झाली नाही. विदर्भातला शेतकरी आधी गारपिटीनं आणि नंतर लांबलेल्या मान्सूननं पार खचून गेलाय. त्यामुळे आम्हाला इच्छमरण द्या अशी परवानगी घेण्यासाठी शेतकरी दिल्लीकडे निघाले आहे.

विदर्भातल्या कोलमडलेल्या शेतीसाठी 24 जुलैला दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन करणार आहेत. विदर्भातले 50 तैे 100 शेतकरी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन इच्छामरणाची परवानगी मागणार आहेत. शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष नसल्याचा आरोप या शेतकर्‍यांनी केला आहे.

विदर्भात मागील वर्षी पावसाने पाठ फिरवली होती त्यामुळे दुष्काळाला चटके शेतकर्‍यांना सहन करावे लागले होते. पण या दुष्काळातून शेतकर्‍यांनी कशीबशी सुटका तर करुन घेतली. पण अस्मानी संकटाने मात्र शेतकर्‍यांचा काही पिश्चा सोडला नाही. विदर्भाला गारपिटीने झोडपून काढले होते त्यामुळे शेतकर्‍यांचे हातची पिकं वाया गेली होती.

पण यंदातरी मान्सून वेळेवर बरसणार अशी आशा बाळगून असलेल्या बळीराजांच्या पदरी यंदाही निराशा आली. मान्सूनने तब्बल महिनाभर उशीर लावला त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला.आधी गारपिटीने आणि नंतर लांबलेल्या मान्सूननं पार खचून गेलाय. सोबत शेतमालाला योग्य भावही मिळत नसल्यानं जगणं अशक्य झाल्याची खंत या शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच आत्महत्या पेक्षा आम्हाला इच्छामरण द्या अशी मागणीच शेतकरी करत आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close