धक्कादायक, नागपूरजवळच्या नद्यात विषयुक्त पाणी !

July 22, 2014 9:27 PM0 commentsViews: 1346

22 जुलै : नागपूर शहराजवळच्या बुटीबोरीमध्ये डीआरडीओजवळच्या नाल्यात एमआयडीसीतील उद्योगांमधून विषारी रसायनं सोडली जातात. यामुळे चार किलोमीटरच्या परिसरात हे विषारी पाणी पसरलंय. हा प्रकार गेले चार वर्ष सुरू आहे. आणखी घातक प्रकार म्हणजे जवळच्या वेणा नदीच्या धरणातही हे विषयुक्त पाणी जातंय. यामुळे अनेक झाडं आणि प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. या नाल्याच्या एक ते सव्वा किलोमीटरच्या परिसरातल्या पाण्यात ऍसिड सापडलंय असा अहवाल खुद्द महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलाय. पण ही विषारी रसायनं सोडणार्‍या कंपन्यांवर कुठलीही कारवाई झालेली नाही.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close