‘पोळ’खोल, हा पाहा ‘प्लँचेट’ स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ

July 22, 2014 10:33 PM0 commentsViews: 4473

22 जुलै : अंधश्रद्धेविरोधात लढा देणार डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाला पण त्याहुन धक्कादायक म्हणजे तब्बल 11 महिने तपास न लावणारे पोलिसच तपासासाठी अंधश्रद्धेचा वापर केला असल्याची बाब समोर आली. पण आम्ही असं काहीच केलं नाही, उलट आऊटलूक मासिकाचे पत्रकार आशिष खेतान यांच्यावर 100 कोटींचा दावा ठोकणार असा इशारा देणारे पुण्याचे माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांचा आता पर्दाफाश झालाय.

या प्रकरणाचे स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ आयबीएन लोकमतच्या हाती लागला आहे. पत्रकार आशिष खेतान यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनच्या व्हिडिओमध्ये माजी पोलीस कॉन्स्टेबल मनीष ठाकूर याच्यामार्फत दाभोलकरांचा मारेकरी कोण, हे शोधण्यासाठी प्लँचेट केल्याचं पोळ यांनी कबूल केलेलं आहे. इतकंच नाही तर मनीष ठाकूर दाभोलकरांच्या आत्म्याला बोलावून प्लँचेट करत असल्याचंही दिसतंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close