अशीही ‘हिरोपंती’ तरुणाच्या जीवावर बेतली

July 22, 2014 11:44 PM2 commentsViews: 48331

 22 जुलै : नदीला आलेल्या पुराशी दोन हात करण्यार्‍या एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय. मध्य प्रदेशातील बैतुलमध्ये एक तरुण पुरात वाहून गेलाय. या घटनेचा मन हेलावून टाकणारा एक व्हिडिओ समोर आलाय. बैतुलमधल्या माछना नदीवर हा अपघात झालाय. या नदीला पूर आला होता आणि पुराचं पाणी पुलावरुन वाहत होतं. हे सगळं समोर दिसत असताना सुद्धा या तरुणाने ‘हिरोपंती’ करत बाईकवरून पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. या तरुणाने गाडीला कीक मारली आणि पुलावरुन बिनधास्त निघाला पण पुलाच्या मधोमध येताच पाण्याच्या प्रचंड वेगामुळे त्याचा तोल गेला आणि बाईकसह तो नदीत कोसळला. विशेष म्हणजे या पुलावर पुराचं पाणी वाहत असल्यामुळे दोन्ही बाजूला लोकं थांबली होती. लोकांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यानं काही ऐकलं नाही आणि ‘हिरोपंती’ करण्याचं धाडस त्याच्या जीवावर बेतलं. या तरुणाचा अजूनही शोध सुरू आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Pradip Rajput

    Angat Masti…Dusare kahi nahi

  • Nick Asif Ali

    mast kara pan jivana sobat nahi…

close