महाराष्ट्र सदनातल्या वादाला जातीय रंग?

July 23, 2014 10:24 AM1 commentViews: 860

maharashtra sadam

23   जुलै :  महाराष्ट्र सदनातल्या वादाला धार्मिक रंग येऊ लागला आहे. महाराष्ट्र सदनामध्ये मिळणार्‍या सेवा-सुविधांबद्दल शिवसेनेच्या 11 खासदारांनी 17 जुलैला आंदोलन केलं होतं. यावेळी जेवणाची तक्रार करताना त्यांनी कॅटरिंग सर्व्हिसच्या सुपरवायझरला जबरदस्तीने चपाती खायला लावली. हा सुपरवायझर मुस्लीम असून त्याचा रमझानचा उपवास होता, असं वृत्त एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालं आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

अर्शद झुबैर असं त्या सुपरवायझरचं नाव आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र सदनाच्या कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन पुकारलं आणि महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्तांकडे तक्रार केली. महाराष्ट्र सदनामध्ये कॅटरिंगचं काम आयआरसीटीसीकडे आहे. या संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी करत असल्याचं राज्य सरकारने आधीच सांगितलं आहे.

शिवसेनेच्या खासदारांनी मात्र हे वृत फेटाळलं आहे. संसदेतले अधिकारी चूक झाकण्यासाठी या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे तसंच बिपीन मलिक अरेरावी करतात असंही ते म्हणाले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Aabu N Mulla

  पोळी खराब निघाली म्हणून
  नेतेमंडळी केटरिंग च्या तोंडात
  पोळी घालतात , मग आमचे डांबरी रस्ते खराब
  होतात लगेच; मग काय
  आता नेत्यांच्या तोंडात जनतेने डांबर घालायचे का?

close