सेना खासदाराने चपाती कोंबून ‘त्याचा’ रोजा तोडला

July 23, 2014 1:33 PM2 commentsViews: 4432

 vichare contro

22 जुलै :  महाराष्ट्र सदनामध्ये मिळणार्‍या सेवा सुविधांविरोधात आंदोलन करण्याचा प्रकार शिवसेनेच्या अंगाशी आलाय. महाराष्ट्र सदनातील कँटीनमध्ये पुरेशा सुविधा मिळत नसल्याने संतापलेल्या शिवसेना खासदार राजन विचारे यांनी कँटीनमधल्या मुस्लीम कर्मचार्‍याला जबरदस्तीने चपाती भरवून त्याचा रोजा मोडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर कँटीनची जबाबदारी असलेल्या आयआरसीटीसीने कँटीन बंद केले असून या घटनेचे पडसाद आता राज्यसभा आणि लोकसभेतही उमटले आहेत.

दिल्लीत संसदेच्या अधिवेशनासाठी जाणार्‍या खासदारांना गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र सदनात मुक्काम करावा लागत आहे. मात्र महाराष्ट्र सदनातील कँटीनमध्ये खाण्यापिण्याच्या पुरेशा सोयीसुविधा नाहीत. याविरोधात शिवसेनेच्या खासदारांनी महाराष्ट्र सदनात आंदोलनही केले होते. 17 जुलै रोजी शिवसेना खासदारांनी आपला राग कँटीनमधील एका मुस्लीम कर्मचार्‍यावर काढला. या खासदारांनी कँटीनचा मॅनेजर अर्शद याला बळजबरीने चपाती भरवण्याचा प्रयत्न केला.

शिवसेनेच्या खासदारांनी मात्र हे वृत फेटाळलं आहे. या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे तसंच बिपीन मलिक अरेरावी करतात असंही ते म्हणाले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Arun Kokitkar

  bharavnyacha praytn kelay pn… chapati bharvleli nahiye…. ugach dharmik rang deu nka.

 • Aabu N Mulla

  पोळी खराब निघाली म्हणून
  नेतेमंडळी केटरिंग च्या तोंडात
  पोळी घालतात , मग आमचे डांबरी रस्ते खराब
  होतात लगेच; मग काय
  आता नेत्यांच्या तोंडात जनतेने डांबर घालायचे का?
  ???

close