गुजरात दंगलीतील खटले गुजरातमध्येच चालवण्याचे सुप्रिम कोर्टाचे आदेश

May 1, 2009 7:15 AM0 commentsViews: 2

1 मे, दिल्लीगुजरात दंगलीतील खटले राज्याबाहेर चालवण्याची मागणी सुप्रिम कोर्टानं फेटाळली आहे. हे खटले आता गुजरातमध्येच चालणार आहेत. या खटल्यांचा निकाल लवकर लागण्यासाठी 6 फास्ट स्ट्रॅक कोर्टांची स्थापना करण्याचे आणि केसेसमधील साक्षीदारांना संरक्षण देण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत. दंगलीसंबधित केसेस चालवण्यासाठी अहमदाबाद, आणंद, साबरकांता, मेहसाना आणि गुलबर्गा जिल्ह्यांमध्ये फास्ट ट्रॅक कोर्टची स्थापना करण्यात यावी असंही त्यात म्हटलं आहे. 2002 साली गुजरातमध्ये झालेल्या दंगलीसंबधीत 9 केसेस गुजरातबाहेर चालवण्यात याव्यात अशी याचिका राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं दाखल केली होती.

close