वरुण गांधींच्या पॅरोलची मुदत वाढवली

May 1, 2009 7:40 AM0 commentsViews: 3

1 मे, दिल्लीभाजपचे युवा नेते वरुण गांधी यांच्या पॅरोलची मुदत सुप्रिम कोर्टानं वाढवली आहे. पिलिभीतमध्ये प्रचारादरम्यान प्रक्षोभक भाषण प्रकरणी वरुण गांधीना अटक झाली होती आणि त्यानंतर काही दिवसांनी पॅरोलवर सुटका करण्यात आली होती. वरुण गांधीना 14 मे पर्यंत पॅरोल मिळाला आहे. मात्र त्यांनी कोणतीही प्रक्षोभक वक्तव्य करु नयेत अशी सूचनाही कोर्टानं केली आहे. वरुणच्या पॅरोलचा आज शुक्रवारी शेवटचा दिवस होता. 16 एप्रिलला वरुण गांधींची एटाह जेलमधून पॅरोलवर सुटका करण्यात आली होती. कोणत्याही समाजाच्या भावना भडकावणारं भाषण करणार नसल्याच्या हमीवर त्यांची जेलमधून सुटका करण्यात आली होती.

close