भरत बोरगे मृत्यूप्रकरणी 3 अधिकार्‍यांची चौकशी सुरु

May 1, 2009 12:14 PM0 commentsViews: 1

1 मे, मुंबई भरत बोरगे यांच्या मृत्यूप्रकरणी अनिल अंबानी ग्रुपच्या तिघा अधिकार्‍यांची चौकशी सुरु आहे. त्यात सुरक्षा विभागाचा एक उच्च अधिकारी, माजी पोलीस महासंचालक कमल कश्यप यांचा समावेश आहे. तसंच अनिल अंबानी ग्‌ुपच्या एव्हिएशन विभागाच्या प्रमुखांचाही त्यात समावेश आहे. त्याचप्रमाणे अनिल अंबानींच्या चॉपरची देखभाल करणार्‍या एअर-वर्क्स इंजिनीअरिंगच्या दोन कर्मचार्‍यांचीही चौकशी होणार आहे. 27 एप्रिलच्या संध्याकाळी अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचं उघड झालं तेव्हा हे अधिकारी एअरपोर्टवर होते. रेल्वेच्या सूत्रांनी आयबीएन-नेटवर्कला ही माहिती दिली आहे.

close