हे कसले शिक्षक?, चिमुरड्याला लाथेनं उडवलं, पलंगावर आपटलं

July 23, 2014 6:57 PM0 commentsViews: 4211

kolkata_techer23 जुलै : आंध्र प्रदेशमध्ये एका शाळेत तीन अंध मुलांना त्यांच्या शिक्षकाने मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आता कोलकात्यामध्येही अशीच एक घटना उघड झालीय. एका तीन वर्षांच्या लहानग्याला अमानुष पद्धतीने मारहाण केल्याचं सीसीटीव्हीमुळे उघड झालंय.

तीन वर्षांच्या मुलाला शिकवण्यासाठी आलेल्या शिक्षिकेने या मुलाला बेदम मारहाण केलीय. या व्हिडिओमध्ये एकदा तर तिने या मुलाला उचलून पलंगावर फेकून दिल्याचंही दिसतंय. ही शिक्षिका एवढ्यावरच थांबली नाही तर त्या चिमुरड्याला लाथेनंही उडवलं.

15 जुलैला या शिक्षिकेची नेमणूक करण्यात आली होती. तेव्हापासून या लहानग्याला मारहाण होतेय असं पोलिसांनी सांगितलंय. लेक टाऊन पोलीस स्टेशनमध्ये या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close