उत्तर महाराष्ट्राला उन्हाचा तडाखा

May 2, 2009 9:47 AM0 commentsViews: 2

2 मे देशात सगळीकडे उष्णतेनं कहर केला आहे. कोरडं हवामान आणि उन्हाचा जोरदार फटका उत्तर महाराष्ट्राला बसला आहे.जळगाव जिल्ह्यातल्या पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली असून वाढती जंगलतोड आणि पावसाचं कमी झालेलं प्रमाण यामुळे हा उन्हाळा तापदायक ठरला आहे.पावसालाही अजून एक महिनाअवकाश असल्याने भीषण समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. कडक उन्हानं केळीचं उभं पीक करपायला लागलंय. जिल्ह्यातील जवळपास सर्वच प्रमुख नद्या कोरड्या पडल्या आहेत.जमिनीला पाणी नाही,जनावरांना चारा नाही,अक्षरश: कोरडा दुष्काळ जाणवायला लागलांय.उष्णतेची ही लाट थांबली नाही तर तापमानाचा नवा उच्चांक किती नुक्सान करेल याची भीती शेतक-यांना आहे. जिल्ह्यातील सातशे गावांनापाणी टंचाईची समस्या जाणवतेय.

close