लोटस पार्क इमारतीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल

July 23, 2014 9:19 PM0 commentsViews: 510

lotus23 जुलै : अंधेरी येथील लोटस बिझनेस पार्क इमारतीला लागलेल्या आग प्रकरणी इमारतीच्या मालकाविरोधात अंबोली पोलीस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिल्डर आणि इमारतीची देखभाल करणार्‍या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला. यात अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू झाल्याने सदोष मनुष्यवधाच कलम ही लावण्यात आलंय.

मागील शुक्रवारी या इमारतीच्या 21 व्या मजल्याला आग लागली होती. या आगीत इमारतीचे दोन मजले जळून खाक झाले.

आग आटोक्यात आणणारे अग्निशमन दलाचे जवान नितीन इवलेकर शहीद झाले. या आग प्रकरणी कारवाई करण्याचे संकेत मुंबई पालिकेचे आयुक्त सिताराम कुंटे यांनी दिले होते.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close