नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसची सुप्रीम कोर्टात धाव

July 23, 2014 9:25 PM0 commentsViews: 565

sonia-and-rahul_350_08051301012123 जुलै : नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसने आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. दिल्ली कोर्टाने या प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस बजावली होती.

या नोटिशीला काँग्रेसनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय. नॅशनल हेराल्डची मालकी असलेल्या असोसिएटेड जर्नल्स ही कंपनी ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस पक्षाने सोनिया गांधी यांच्या मालकीच्या यंग इंडियन लिमिटेड या कंपनीला विनातारण कर्ज दिल्याच्या आरोप आहे.

मध्यंतरी आपल्याला पाठवण्यात आलेली ही नोटीस सूड भावनेतून आहे असा आरोप सोनियांनी मोदी सरकारवर केला होता.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close