आणखी ‘पोळ’खोल, प्लँचेटच्या आधारे खंडेलवालला केली होती अटक

July 23, 2014 9:42 PM0 commentsViews: 1504

Gulbrao pol sting image23 जुलै : डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खून प्रकरणाच्या तपासासाठी पुणे पोलिसांनी प्लँचेटचा वापर केल्याचा लेख काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाला होता. यासंबंधीचं पुण्याचे माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांचं एक स्टिंग ऑपरेशन मंगळवारी उघड झालं. या प्रकरणला आज आणखी एक वळण लागलंय. 29 नोव्हेंबरला खडकीमध्ये मनीष ठाकूर यानं प्लँचेट केलं तेव्हा आपण हजर होतो, असा दावा नागोरी टोळीच्या विकास खंडेलवाल याने केलंय.

खंडेलवाला दाभोलकर खूनप्रकरणी अटक करून नंतर पुराव्याअभावी सोडण्यात आलं होतं. आता खंडेलवालनंं त्याचे वकील बीजू अलूर यांच्यामार्फत पुणे पोलिसांविरोधात तक्रार दाखल केलीय. अलूर यांनी याच प्लँचेटच्याच आधारे आपल्याला अटक केल्याचं खंडेलवालचं म्हणणं आहे. खंडेलवाल याला दाभोलकर प्रकरणात अटक केल्याचा युक्तीवाद केलाय.

पोलिसांनी कारवाई करावी नाहीतर कोर्टात जाऊ असा इशारा अलूर यांनी दिलाय. नागोरी टोळीतील मनीष नागोरी आणि विकास खंडेलवालला पोलिसांनी अटक केली होती आणि नंतर त्यांची पुराव्याअभावी सुटका झाली होती. मात्र पोलिसांनी दाभोलकर यांच्यावर ज्या पिस्तुलीने गोळीबार करण्यात आला होता त्याच प्रकारची पिस्तुल खंडेलवाल यांने वापरली या संशयावरुन अटक करण्यात आल्याचं सांगितलं होतं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close