तैवानमध्ये विमान कोसळलं, 51 ठार

July 23, 2014 9:50 PM0 commentsViews: 2464

Taiwan Plane Crash in Typhoon's23 जुलै : युक्रेनजवळ मलेशियन विमान मिसाईल हल्ल्यात पाडण्यात आल्याची घटना ताजी असताना आणखी एका विमानाला अपघात झालाय. तैवानच्या पेंघु बेटाजवळ ट्रान्स एशिया एअरवेजचं विमान कोसळून 51 जणांचा मृत्यू झाला आहे. तैवान सरकारने दुजोरा दिलाय.

हे विमान इमर्जन्सी लँडिंगच्या प्रयत्नात होतं त्यावेळी ही दुर्घटना घडली. सिन्हुआ वृत्त संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत 11 जण जखमी झाले आहे. या अगोदर 51 लोकांच्या मृत्यूची माहिती देण्यात आलीय. दोन इंजिन असलेलं एटीआर-72 टर्बोप्रोप असं हे विमान होतं. या विमानात 54 प्रवाशी आणि चार वैमानिक सदस्य होते.

हे विमान दक्षिण तैवानच्या काओहसिऊंगहून पश्चिम भागात पेंघु बेटाकडे जात होतं. हे विमान संध्याकाळी 4 वाजता रवाना होणार होतं पण खराब हवामानामुळे संध्याकाळी 5.43 विमानाने उड्डाण केलं.

दुर्घटनाग्रस्त विमान या अगोदर मागोंग विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. बेटावर हवामान खराब असल्यामुळे या विमानाला अपघात झाला अशी माहिती तैवान नागरिक उड्डाण प्रशासन महानिर्देशक जेआन शेन यांनी दिली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close