भारतात स्वाईन फ्लूचे दोन संशयित रुग्ण

May 2, 2009 10:06 AM0 commentsViews:

2 मेस्वाईनफ्लूसंसर्गाचा एक पेशंट आशियातही आढळलाय. हाँगकाँगमध्ये मेक्सिकोहून आलेल्या पर्यटकाला स्वाईनफ्लूची लागण झालीय. आशियातला स्वाईन फ्लूसंसर्गाचाहा पहिला पेशंट आहे. 25 वर्षांच्या या पर्यटकाला सध्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. त्याच्या संपर्कात आलेल्या दोघांचीही हॉस्पिटलमध्ये तपासणी सुरू आहे. हा पर्यटक ज्या हॉटेलमध्ये राहत होता, तिथे बाहेरच्यांना प्रवेश बंद करण्यात आलाआहे, तर हॉटेलमधल्या पर्यटकांचंही बाहेर पडणं बंद करण्यात आलंय. हाँगकाँग सरकारने आता विमानतळं, रेल्वे या ठिकाणी पर्यटकांची कडक तपासणी सुरू केली आहे. त्याठिकाणी टॅमीफ्लूचा साठाही वाढवण्यात आलाय. दरम्यान, स्वाईन फ्लूचा पहिला रुग्ण सापडलेल्या मेक्सिकोत पाच दिवसांचा बंद जाहीर करण्यात आलाय. भारतातही आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. औषधांचा पुरेसा साठा करण्याचे आणि प्रतिबंधात्मक यंत्रणा सज्ज करण्याचे आदेश सर्व राज्यांना देण्यात आले आहेत. स्वाईन फ्लूचा प्रभाव आता आशियातही आढळतोय. भारतात दोन रुग्ण आढळल्यापठोपाठ आता मॅक्सिकोतही साईन फ्लूमुळे आपला प्रभाव दाखवायला सुरवात केली आहे. हॉंगकॉंगमध्ये मेक्सिकोहुन आलेल्या पर्यटकाला स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. आशियातला स्वाईन फ्लूसंसर्गाचा हा पहिला रुग्ण आहे. या रुग्णाला हॉस्पिटलमध्येदाखल करण्यात आलं आहे. हा पर्यटक रहात असलेल्या हॉटेलमध्ये प्रवेशाला बंदी आहे. हाँगकाँग सरकारने आता रेल्वे , विमानतळ अशा ठिकाणी पर्यटकांची कडक तपासणी करण्ययास सुरवात केली आहे.या परिसरात टॅमी फ्लू या औषधाचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्यात आला आहे.

close