राष्ट्रवादीच्या 144 जागांची मागणी काँग्रेसला अमान्य?

July 24, 2014 12:45 PM0 commentsViews: 1201

congress NCP

24  जुलै : सह्याद्री अतिथीगृहावर काल रात्री झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी समन्वय समितीच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा झाली. राष्ट्रवादीने 144 जागांची मागणी केली मात्र काँग्रेसला हा प्रस्ताव मान्य नाही. राष्ट्रवादीला जागा वाढवून देण्याचा प्रश्नच येत नाही, असं काँग्रेसचं म्हणणं आहे. काही जागांची अदलाबदल शक्य असल्याचं समजतंय. तर अपक्ष आमदारांनाही पक्षातर्फे तिकीटं देण्यात येतील, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आयबीएन लोकमतला दिली आहे.

दरम्यान, पुण्यात आज काँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्र कार्यकर्ता संकल्प मेळावा होणार आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री, माणिकराव ठाकरे, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, सुशीलकुमार शिंदे, पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील उपस्थित राहणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात रणनीती काय असावी यावर या मेळाव्यात मंथन होईल.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close