सांगलीमध्ये दोन मुलींची आत्महत्या

May 2, 2009 10:14 AM0 commentsViews: 1

2 मेनापास होण्याच्या भीतीने सांगलीमधल्या दोन विद्यार्थिनींनी आत्महत्या केली आहे. अश्विनी पवार आणि रुपाली वडार या दोन्ही मुली आठवीत शिकत होत्या. मात्र दुर्देवाची गोष्ट अशी की त्या दोन्ही मुली परिक्षेत पास झाल्याचं लक्षात आलं आहे. आज या मुलींच्या शाळेचा निकाल होता. पण कालपासूनच या मुली बेपत्ता होत्या. नापास होण्याच्या भीतीनं या मुलींनी काळी खण तलावात उडी मारुन आत्महत्या केली. पण आज जेव्हा निकाल जाहीर झाला तेव्हा रुपालीला 49 टक्के तर अश्विनीला 44 टक्के गुण मिळाले होते. या घटनेनं सांगलीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

close