नाराजीनाट्याचा ‘तिसरा अंक’, राणे दिल्ली दरबारी हजर

July 24, 2014 3:46 PM0 commentsViews: 2187

rane_meet_rahul24 जुलै : काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या नाराजीनाट्याचा ‘तिसरा अंक’ आता दिल्ली होणार आहे. नारायण राणे आज (गुरुवारी) दिल्लीत दाखल झाले आहेत. बुधवारी रात्री राणेंची काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींशी फोनवर चर्चा झाली असून प्रत्यक्ष भेटीसाठी ते दिल्लीला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

राहुल गांधींची भेट घेऊन ते आपल्या नाराजीची कारणं आणि मागण्या ठेवण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राणेंच्या नाराजीवर चर्चा झाली.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हायकमांडला त्याबाबत माहिती दिली. आज संध्याकाळी राहुल यांच्यासोबत होणार्‍या बैठकीनंतर राणे आपल्या पुढील राजकीय वाटचालीवर निर्णय घेतील असा अंदाज आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close