आर्थिक मंदीमुळे भारताच्या निर्यातवृद्धीत घट

May 2, 2009 1:16 PM0 commentsViews: 5

2 मे आर्थिक मंदीमुळे भारताच्या निर्यातवृद्धीत घट झाली आहे. मार्च महिन्यातच निर्यात 33 टक्क्यांनी कमी झाली . अमेरिका आणि यूरोपमध्ये लोकांची खरेदी क्षमताही कमी झाली आहे. त्याचा परिणाम भारताच्या निर्यातीवर झाल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं. 2008 -09 या चालू आर्थिक वर्षात देशाची निर्यात 170 अब्ज डॉलर्सपेक्षाही कमी आल्याचं समजतंय. गेल्या सहा महिन्यात निर्यातवृद्धीचा दर घटला आहे तर एकीकडे भारताच्या आयातीचा दरही वाढल्याचं लक्षात आलं आहे. आयातीचा दरही चौदा टक्क्यांनी वाढून 280 अब्ज डॉलर्स इतका झाला आहे.

close