आक्षेपार्ह पद्धतीनं आंदोलन करणार्‍या सेनेच्या खासदारांवर कारवाई व्हावी का ?

July 24, 2014 4:35 PM2 commentsViews: 794

आक्षेपार्ह पद्धतीनं आंदोलन करणार्‍या सेनेच्या खासदारांवर कारवाई व्हावी का ? असा होता आजचा सवाल

भाजपचे खासदार किरीट सोमैया, वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक कार्यकर्ते अब्दुल कादर मुकादम, पत्रकार सुरेश भटेवरा आणि शिवसेनाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील सहभागी होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Yashdeep Joshi

  कार्यक्रमाच्या अंती ७६% लोकांनी “कारवाई करू नये” असा प्रतिसाद दिला, त्या समस्त सुज्ञ प्रेक्षकांचे अभिनंदन.

  अब्दुल कादर मुकादम यांनी मांडलेल्या “प्रत्येकाची व्यक्तिगत प्रतिष्ठा जपली पाहिजे “, या मुद्द्याशी मी सहमत आहे.

  मात्र या समस्त घटनेचा व्हिडियो मी २-३ वाहिन्यांवरून पाहिला आहे, मात्र आपण सांगताय त्याप्रमाणे त्यात कुठेही संबंधित “अर्शदच्या ” शर्टवर त्याच्या नावाची पाटी नाही, त्याच्या हिरव्या रंगाच्या शर्टच्या खिशावर केवळ 1 बॉलपेन आणि एक चमकणारी वस्तू दिसत आहे. हे मी यु-ट्युबवर पुन्हापुन्हा तपासले आहे.” त्यामुळे त्याचे नाव आंदोलकांना लक्षात येणे शक्य नाही. तसेच “या क्षणी पोळी खाणे माझ्या विशिष्ट धर्माच्या विरुद्ध आहे” , असे तो कुठेही सांगताना दिसत नाही. निश्चितच, प्रत्येकाची व्यक्तिगत प्रतिष्ठा जपली पाहिजे.

  ज्या वृत्तपत्रांनी-माध्यमांनी आणि राजकीय पक्षांनी या घटनेला हिंदू-विरुद्ध मुस्लिम असा रंग देण्याचा प्रयत्न केला , त्यांचा मी तीव्र निषेध करतो. २००८ च्या मनसेच्या आंदोलनाच्या वेळेलाही, हिंदी-इंग्रजी माध्यमांनी मराठी तरुणांवर रेल्वेच्या नोकर भरतीत होत असलेल्या अन्यायाची बाजू मांडली नाही, व जणू काही संपूर्ण न्यायव्यवस्था आपल्याच मुठीत आहे, अशा पद्धतीने एकतर्फी न्याय देऊन मोकळे झाले.

  या घटनेमध्ये हिंदू-विरुद्ध-मुस्लिम असा वाद उभा राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

  पुण्यातील २ प्रतिष्ठित वृत्तपत्रांना मी वारंवार प्रतिक्रिया पाठवून हे सत्य कानावर घालत आहे, परंतु ते माझी शालीन भाषेतील प्रतिक्रिया छापत नाहीयेत आणि शिवसैनिकांच्या विरुद्ध असलेल्या असभ्य प्रतिक्रियासुद्धा मोकाट छापत आहेत. खचितच मिडिया आणि वृत्तपत्रांनी या घटनेद्वारे एक डाव खेळला आहे.

  अशा खोट्या वृतांमुळे लोकांचा “निःपक्ष पत्रकारिता” इत्यादी गोष्टींवरचा विश्वास उडेल.

 • gj2323

  Aavhad saheb chapati khali padlywar tondat nahi kombli vyavastit bagha

close