नारायण राणे वेटिंगवर, निर्णय सोनियांकडे !

July 24, 2014 7:34 PM0 commentsViews: 1497

7878narayan_rane24 जुलै : ‘कोकण वादळ’ अशी गर्जना करुन राजीनामास्त्र उपसणारे काँग्रेसचे नेते नारायण राणे यांना पक्षाने अजूनही वेटिंगवरच ठेवलंय. राणेंनी सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि आज (गुरुवारी) चार दिवसांनंतर राणे दिल्ली दरबारी हजर झाले. राणे यांनी आज उपाध्यक्ष राहुल गांधींची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. साधारण नारायण राणे यांनी राहुल गांधी यांच्यामध्ये पाऊण तास चर्चा केली.

नारायण राणेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. यावर अंतिम निर्णय राहुल गांधीच घेणार आहेत. या भेटीनंतर राणे यांनी मीडियाशी बोलतांना राहुल गांधीशी झालेल्या चर्चेबाबत आपण समाधानी असल्याचं सांगितलंय, मी माझे मत राहुल गांधींना सांगितलं आहे. आता राहुल पक्षाध्यक्षा सोनिया गांधींना भेटणार असून सोनियांशी झालेल्या चर्चेनंतर पुढला निर्णय घेऊ असं राणेंनी स्पष्ट केलं आहे.

याच आठवड्यात सोमवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राणेंच्या नाराजीवर चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हायकमांडला त्याबाबत माहिती दिली. त्यानुसार राणेंनी आज दिल्ली वारी केली. आता सोनिया गांधी काय निर्णय घेता यावर राणेंचं भवितव्य अवलंबून आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close