कसाब अल्पवयीन नाही : स्पेशल कोर्टाचा निर्णय

May 2, 2009 1:57 PM0 commentsViews: 1

2 मे 26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा एकमेव जिवंत आरोपी अजमल कसाब हल्ल्याच्यावेळी 21 वर्षांचाच होता असा निर्णय स्पेशल कोर्टाने आज शनिवारी दिला आहे. स्पेशल कोर्टाने कसाब अल्पवयीन नसल्याचं सांगून बचाव पक्षाचा युक्तिवाद खोटा ठरवला आहे.यापूर्वीही कसाब अल्पवयीन नसल्याचा अहवाल सरकारी वकील उज्वल निकम यांनी मेडिकल रिपोर्टरच्या पुराव्यासह डॉक्टरांच्या साक्षीने कोर्टात सादर केला होता. पण सुनावणी दरम्यान कसाबचे वकील अब्बाज काझमी यांनी या मेडिकल रिपोर्टमधे फेरवार झाल्याचं सांगून या मेडिकल रिपोर्टरवर आक्षेप घेतला होता. आपल्याला हा अहवाल मान्य नसल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. पण स्पेशल कोर्टाच्या या सुनावणीमुळे एकप्रकारे कसाबची स्वतःला वाचवण्याची अजून एक चाल अयशस्वी ठरली आहे.

close