शिक्षकी पेशाला काळिमा, शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण

July 24, 2014 9:57 PM0 commentsViews: 957

mumbai_warli24 जुलै : आंध्रप्रदेश, कोलकात्यापाठोपाठ मुंबईतही एका शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना घडलीय. मुंबईतील वरळीतील एका खाजगी क्लासमधील शिक्षिकेनं विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.

अभ्यास न केल्याच्या कारणावरुन खाजगी ट्युशन घेणार्‍या शिक्षिकेनं निनाद धोत्रे या मुलाला बेदम मारहाण केलीय. विशेष म्हणजे या मारहाणीनंतर घरी काही सांगू नकोस म्हणून या विद्यार्थ्याला दुपारी दोन वाजेपर्यंत आपल्याच घरात बळजबरीनं बसवून ठेवलं होतं.

या सर्व प्रकारानंतर मुलाची आई तक्रार करायला गेली. पण पोलिसांनी तक्रार घ्यायलाही टाळाटाळ केल्याचा आरोप मुलाच्या आईनं केलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close