युपीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार मनमोहन सिंगच – राहुल गांधी

May 4, 2009 4:46 AM0 commentsViews:

4 मे मनमोहन सिंग हेच पंतप्रधानपदासाठी काँग्रेसचे उत्कृष्ट उमेदवार आहेत, असा विश्‍वास काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. बरमेरचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार हरीश चौधरी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. मनमोहन सिंग हेच पंतप्रधान बनावेत, या मुद्द्यावर आपण आणि आपली आई सोनिया गांधी ठाम आहोत, असंही राहुल गांधी त्यावेळी म्हणाले. अणुकराराच्या वेळी काँग्रेस पक्ष मनमोहन सिंग यांच्या पाठीशी ठामपणे उभा होता. तसंच आताही पंतप्रधान पदासाठी राहणार आहे, असं राहुल यांनी त्या सभेत सांगितलं. नुकतीच आयबीएन-18 साठी सुहासिनी हैदर यांनी मनमोहन सिंग यांची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीत राहुल गांधी हे युपीएचे तरूण पंतप्रधान असतील अशी इच्छा मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली होती.

close