शिवसेनेच्या शिलेदारांची राजनी केली पाठराखण

July 24, 2014 11:21 PM3 commentsViews: 7093

3raj_on_sena new24 जुलै : नेहमी शिवसेनेवर सडकून टीका करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सदनात रोजा तोडण्याचा घडलेल्या प्रकरणात शिवसेनेच्या शिलेदारांची पाठराखण केलीय. जर माणसाला समोरची व्यक्ती जर कोणत्या धर्माची आहे, ती कोण आहे हे जर माहित नसेल तर अशी एखादी गोष्ट अनावधानाने घडली असेल तर त्यावर वाद घालण्याची आणि वाढवण्याची गरज नाही अशी बाजू राज ठाकरे यांनी मांडलीये.

तसंच राजन विचारे यांच्याकडून झालेला प्रकार हा जाणिवपूर्वक नव्हता हे आता तरी स्पष्ट होतंय असंही राज म्हणाले. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ‘कृष्णकुंज’ इथं पत्रकार परिषद पार पडली यावेळी ते बोलत होते.

17 जुलै रोजी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याचा कारणावरुन शिवसेनेच्या खासदारांनी थेट कँटिनवर हल्लाबोल केला होता. यावेळी सेनेचे खासदार राजन विचारे यांनी एका मुस्लीम मॅनेजरच्या तोंडात चपाती कोंबण्याचा प्रयत्न केला. रमजानचा महिना सुरू असल्याने त्याचा रोजा बळजबरीने तोडला गेला असा आरोप विचारेंवर झाला. सेनेच्या या कृत्यावर चौफेर टीका झाली.

उद्धव ठाकरे यांनाही सारवासारव करावी लागली. तर तो व्यक्ती मुस्लीम होता हे मला माहिती नव्हतं असं सांगून विचारे यांनी दिलगिरी व्यक्त केली. पण नेहमी एकमेकांना पाण्यात पाहणारे राज यांनी या प्रकरणी शिवसेनेच्या शिलेदारांची बाजू घेतलीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • jai maharashra

  बरं, खानसाम्याच्या युनिफॉर्मवर
  त्याचं नावं होतं, असा दावा विरोधकांनी केला होता. पण त्याच्या युनिफॉर्मवर
  नाव नव्हतं, शिवाय तो कोणत्या धर्माचा आहे ते कपाळावर लिहिलेलं नसतं,
  शिवाय संबंधित व्हिडीओमध्येही खानसाम्याचं नाव नसल्याचं स्पष्ट दिसत आहे.

 • jai maharashra

  नवी दिल्ली : महाराष्ट्र सदनातील वादाला अखेर वेगळं
  वळण लागलं आहे. निकृष्ट जेवण आणि मराठी खासदारांचा सन्मान हे मुद्दे
  बाजूलाच पडले आहेत. ‘रोजा मोडला’ हा मुद्दा घेऊन नवा वाद उफाळून आला आहे.
  मात्र मूळ वाद बाजूला ठेवून ‘रोजा मोडला’ हा मुद्दा चर्चिला घ्यायचा असेल
  तर त्या व्हिडीओमध्ये खरंच त्या खानसाम्याने चपाती खाल्ल्याचं दिसतं का आणि
  खरंच त्याचा रोजा मोडला का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

  ‘सामना’तूनही
  या प्रकारावर जोरदार टीका करण्यात आली आहे. हा चपात्यांचा बोळा खरंतर
  मुख्यमंत्री, बांधकाममंत्री, मुख्य सचिव बिपीन मलिक यांच्या तोंडात कोंबला
  पाहिजे. तो ठेकेदार कोणत्या धर्माचा, पंथाचा किंवा जातीचा आहे त्याच्या
  कपाळावर लिहून ठेवलेले असते का? शिवसैनिकांनी एका मुस्लिमाचा रोजा
  तोडण्याचा प्रयत्न केल्याच्या बातम्या पद्धतशीरपणे मंत्रालयातून पेरण्यात
  आल्या आहेत, असा सवाल सामनातून उपस्थित केला आहे.

  महाराष्ट्र सदनात मिळणाऱ्या सोयी सुविधा, व्यवस्था याविरोधात
  असंतोष व्यक्त करणं हा काही गुन्हा नाही. या मुद्द्यावरुन लक्ष विचलीत
  करण्यासाठी ‘रोजा’ मोडल्याचा वाद निर्माण करुन त्याला वेगळं वळण लावलं आहे.
  हा प्रकार अत्यंत हीन असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.

  मात्र
  विरोधकांना खानसाम्याचे रोजा मोडल्याचा कांगावा केला. आपण हिंदुत्त्ववादी
  असलो तरी इतर धर्माचा द्वेष करत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
  महाराष्ट्र सदन वादाला जाणीवपूर्वक धार्मिकतेचा रंग दिला जात असल्याचा दावा
  शिवसेना करत आहे. तसंच खानसाम्याला चपाती भरवून रोजा मोडण्याचा प्रयत्न
  म्हणजे मूळ वादापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचंही शिवसेनेचे
  म्हणणं आहे.

  महाराष्ट्र सदनातील खानसाम्याला जबरदस्ती चपाती
  खायला घालून रोजे मोडल्याचा आरोप शिवसेना नेत्यांवर करण्यात येत आहे.
  मीडियामध्येही अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित होत असताना शिवसेना
  खासदारांची बाजू डावलण्यात येत असल्याचं पक्षाचं म्हणणं आहे.

  कारण
  या प्रकरणाचा व्हिडीओ पाहिल्यास खानसाम्याला जबरदस्तीने चपाती खायला
  घालण्यात येत असल्याचं दिसत असलं तरी प्रत्यक्षात त्याच्या तोंडात चपातीच
  गेली नाही, मग त्याचे रोजे मोडल्याचा आरोप शिवसेना खासदारांवर का करण्यात
  येत आहे, हा सेनेचा सवाल आहे.

  चपाती खायला घालताना त्या खानसाम्याचा धर्म माहित नव्हता, मात्र
  झालेल्या प्रकारामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त
  करतो, असं स्पष्टीकरण शिवसेना खासदार राजन विचारे यांनी दिलं आहे.

  महाराष्ट्र
  सदनात राज्याच्याच खासदारांना दुय्यम वागणूक मिळत आहे. तसंच तिथे
  मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या जेवणाविरुद्ध शिवसेनेच्या खासदारांनी आवाज
  उठवला. त्यामुळे संतापलेल्या खासदारांनी तिथे असलेल्या खानसाम्याच्या
  तोंडात चपाती भरवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या ठिकाणी कोणत्याही
  धर्माचा किंवा जातीचा जेवण बनवणारा किंवा खानसाम्या असता, तर
  त्याच्याबाबतीतही शिवसैनिकांनी हीच भूमिका घेतली असतं. इथे त्याला धर्म
  विचारुन भरवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं दिसत नाही. शिवाय त्याच्या
  त्याच्या तोंडात चपाती गेली नसल्याचंही व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत असल्याचा
  दावा शिवसेनेने केला आहे.

  बरं, यातील आणखी एक वाद म्हणजे, खानसाम्याच्या युनिफॉर्मवर
  त्याचं नावं होतं, असा दावा विरोधकांनी केला होता. पण त्याच्या युनिफॉर्मवर
  नाव नव्हतं, शिवाय तो कोणत्या धर्माचा आहे ते कपाळावर लिहिलेलं नसतं, असं
  शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटलं
  आहे. शिवाय संबंधित व्हिडीओमध्येही खानसाम्याचं नाव नसल्याचं स्पष्ट दिसत
  आहे.

  दुसरीकडे महाराष्ट्र सदनातील प्रकार निंदानीय आहे. या
  प्रकाराची चौकशी होईल आणि त्यानंतरच दोषींवर कारवाई होईल, असं राज्याचे
  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

  आता
  महाराष्ट्र सदनात झालेल्या या गोंधळानंतर सदनातील उपहारगृहाची जबाबदारी
  आयआरसीटीसी या कंपनीकडून काढून घेण्यात आली आहे. त्यांच्याजागी आता महिला
  बचत गट हे उपहारगृह चालवतील. यावरुन तर हे स्पष्ट होतं की आम्ही निकृष्ट
  जेवणाविरुद्ध केलेलं आंदोलन हे योग्यच असल्याचं खासदारांचं म्हणणं आहे.
  आंदोलनात शिवसेना खासदार आक्रमक झाले असले तरी त्यांनी त्या खानसाम्याचे
  रोजे मोडले नसल्याचा दावा ते करत आहेत आणि व्हिडीओमध्येही हे स्पष्ट
  दिसल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.

  खरंतर कोणत्याही धर्माचा
  आदर राखायलाच हवा. कोणाचाही धार्मिक भावना दुखवू नयेत यासाठी सर्वांनीच
  कटिबद्ध असावं. मात्र धर्माच्या नावाखाली राजकारण करणारे हेच खरे गुन्हेगार
  असून त्यांना कठोर शासन व्हायला हवं.

 • फटकार मराठी

  ……..मुद्दाम भावना दुखावण्यासाठी केले असेल का ?

close