टी -20 वर्ल्डकपसाठी भारतीय टीम जाहीर

May 4, 2009 7:36 AM0 commentsViews: 3

4 मे इंग्लंडमध्ये 5 जूनपासून सुरु होणार्‍या टी -20 वर्ल्डकप साठी भारतीय टीमची निवड करण्यात आली. या टीममध्ये आर.पी.सिंगने अपेक्षेप्रमाणेच टीममध्ये कमबॅक केलं आहे. सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये तो टॉप फॉर्ममध्ये आहे. आर.पी.बरोबरच चेन्नई सुपर किंग्ज टीममधला डावखुरा बॅट्समन सुरेश रैनालाही संधी देण्यात आली आहे. इरफान आणि युसुफ पठाण बंधू विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांचीही अपेक्षेप्रमाणे टीममध्ये निवड झालीय. युवराज सिंग आणि रोहीत शर्मा यांनीही टीममधली जागा टिकवलीय. हरभजन सिंग आणि प्रग्यान ओझा यांच्यावर स्पीनची जबाबदारी असेल. तर फास्ट बॉलिंगची भिसत असेल ती झहीर खान, प्रवीण कुमारवर. मात्र मुंबईच्या अभिषेक नायरची संधी यावेळी हुकली आहे. इंग्लंडमध्ये होणार्‍या टी -20 वर्ल्डकप साठी एस. श्रीसंतला पुन्हा एकदा डच्चू देण्यात आला आहे.

close