सेनेचे आमदार घोसाळकरांविरोधात आता भाजप नगरसेविकेची तक्रार

July 25, 2014 3:09 PM0 commentsViews: 1047

vinod ghosalkar 4325 जुलै : शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर महिला नगरसेविकांना त्रास दिल्याबद्दल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काही महिन्यांपूर्वी शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी घोसाळकर त्रास देत असल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे तक्रार केली होती.

आता भाजप नगरसेविका मनीषा चौधरी यांनी विनोद घोसाळकरांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. बोरिवलीच्या एक्सर परिसरातील चौकाला मनिषा चौधरी यांच्या पुढाकारानं दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांचं नाव देण्यात आलंय.

मात्र ते नाव बदलून ‘एक्सर गावदेवी चौक’ असं त्याचं नामकरण करण्याचा आग्रह घोसाळकरांनी पालिकेकडे धरल्याचा चौधरी यांचा आरोप आहे. चौधरी यांच्या प्रस्तावाविरोधात एक्सर परिसरातील नागरिकांच्या सह्या घोसाळकरांनी गोळा केल्याचंही स्पष्ट झालंय.

हा सगळा प्रकार असह्य झाल्याने गुरुवारी पालिकेच्या आर मध्य प्रभाग समितीच्या बैठकीत चौधरी यांना अश्रू अनावर झाले. दरम्यान, घोसाळकर यांनी हे आरोप फेटाळले असून चौकाचं नामकरण आधीच झाल्याचं मला माहित नसल्याने मी तसा प्रस्ताव दिल्याचं स्पष्टीकरण दिलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close