धनगर समाज आरक्षण आंदोलन, 5 उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली

July 25, 2014 5:51 PM0 commentsViews: 1288

st_andolan25 जुलै : धनगर समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करावा या करता बारामतीमध्ये आंदोलन सुरू आहे. धनगर समाज आरक्षण कृती समितीचे 16 कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. 16 उपोषणकर्त्यांपैकी पाच जणांना प्रकृती खालवल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

धनगर समाज आरक्षण कृती समितीने 24 जुलैपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय घ्या अशी मुदत सरकारला दिली होती. ती मुदत गुरुवारीच संपलीये. मात्र, सरकारने काहीच निर्णय न घेतल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आज बारामतीमधून आंदोलनाची पुढली दिशा ठरवली जाणार आहे. त्यासंबंधी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली जाणार आहे.

त्यापुर्वी आज धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध करणारे राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड यांच्या पुतळ्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली होती. दरम्यान, आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकार चालढकल करत आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close