जडेजा मॅच बंदीतून वाचला, 50 टक्के मानधन जाणार

July 25, 2014 6:37 PM0 commentsViews: 2289

jadega25 जुलै : नॉटिंगहॅम टेस्टमध्ये भारतीय क्रिकेटर रवींद्र जडेजा आणि इंग्लंडचा बॉलर जेम्स ऍन्डरसन यांच्यातील शाब्दीक चकमक आणि धक्काबुक्की प्रकरणी जडेजा लेव्हल 1 अंतर्गत दोषी आढळला आहे. पण जडेजावर बंदीची कारवाई टळली असून मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आलाय.

नॉटिंगहॅम टेस्टमध्ये दुसर्‍या दिवशी मध्यंतरानंतर मैदानातून बाहेर जाताना जेम्स ऍन्डरसन आणि जडेजामध्ये शाब्दिक चकमक उडाली होती. यानंतर भारतीय टीमनेही जेम्स ऍन्डरसनच्या विरोधात अपशब्दाचा वापर केल्याचा आरोप आहे. या प्रकारमुळे इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ईसीबी)ने तक्रार दाखल केली होती.यात जडेजावर श्रेणी-2 चे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. पण सुनावणी दरम्यान जडेजाला लेव्हल 1 अंतर्गत दोषी ठरवण्यात आलं.

मात्र बीसीसीआयने जडेजावर झालेल्या कारवाईच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. जडेजाची चूक नव्हती आणि बीसीसीआय जडेजाच्या पाठिशी भक्कमपणे उभी आहे, असं बीसीसीआने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय. तसंच आयसीसीच्या निर्णयाविरोधात अपिल करण्याचा आम्हाला अधिकार आहे, असंही बीसीसीआयनं आपल्या पत्रकात स्पष्ट केलंय. विशेष म्हणजे ऍन्डरसनवर आयसीसीच्या आचारसंहितेच्या नुसार लेव्हल-3 चं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची 1 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. ऍन्डरसन जर दोषी आढळला तर त्याच्यावर दोन ते चार टेस्ट मॅच किंवा चार ते आठ वनडे मॅचसाठी बंदीची कारवाई होऊ शकते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close