भारताला तिसरे गोल्ड मेडल, अभिनवने साधला ‘सुवर्ण’वेध

July 25, 2014 10:37 PM0 commentsViews: 1008

 Abhinav Bindra clinches gold25 जुलै : ग्लासगोमध्ये सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने आता गोल्ड मेडलची हॅट्रिट्क साधली आहे. आज भारताचा स्टार शूटर अभिनव बिंद्राने नेमबाजीत गोल्ड मेडल पटकावलं आहे. 10 मीटर एअर रायफल प्रकारात अभिनवने सुवर्ण वेध घेतलाय.

भारताचा स्टार शूटर अभिनव बिंद्राने कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल पटकावलंय.आपल्या आवडत्या 10 मीटर एअर रायफलमध्ये त्यांने हा पराक्रम केलाय. त्याने फायनलमध्ये 205.3 असा स्कोअर केला. त्याचं कॉमनवेल्थ गेम्समधलं हे पहिलंच गोल्ड मेडल आहे. अभिनवच्या भरीव कामगिरीमुळे भारताच्या खात्यात तीन गोल्ड मेडल जमा झाले आहे.

आजच्या स्पर्धेत अभिनवच्या सोबत असलेला रविकुमारने सुरुवात चांगली केली पण नंतर फॉर्म ढासळल्यामुळे चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या अगोदर अवघ्या 16 वर्षांच्या मलायका गोयलने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात सिल्व्हर मेडल पटकावले आहे. तसंच हिना सिद्धूने ही निराशा केली नाही.

मलायकाने 378 गुणासह चौथ्या स्थानी झेप घेतलीय. आणि नेमबाजीत संध्याकाळी भारताने पहिले गोल्ड मेडल मिळवले. कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताच्या खात्यात आतापर्यंत नऊ मेडल जमा झाले आहे. यात तीन गोल्ड आणि चार सिल्व्हर आणि दोन ब्राँझ मेडल आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close