IBN लोकमत इम्पॅक्ट : ‘त्या’ शिक्षिकेला अखेर अटक

July 25, 2014 8:45 PM0 commentsViews: 677

mumbai_warli25 जुलै : मुंबईतील वरळी भागात लहान मुलाला बेदम मारहाण करणार्‍या शिक्षिकेला अखेर अटक करण्यात आली आहे. वरळी पोलिसांनी ही कारवाई केलीय.

निनाद धोत्रे हा मुलगा तासमीन कासमणी या शिक्षिकेकडे शिकवणीला जायचा. अभ्यास केला नाही म्हणून तिनं या मुलाला बेदम मारहाण केली होती.

विशेष म्हणजे या मारहाणीनंतर घरी काही सांगू नकोस म्हणून या विद्यार्थ्याला दुपारी दोन वाजेपर्यंत आपल्याच घरात बळजबरीनं बसवून ठेवलं होतं. या सर्व प्रकारानंतर मुलाची आई तक्रार करायला गेली.

पण पोलिसांनी तक्रार घ्यायलाही टाळाटाळ केल्याचा आरोप मुलाच्या आईनं केलाय. आयबीएन लोकमतने ही बातमी दाखवल्यानंतर अखेर या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय आणि आरोपी शिक्षिका आणि तिच्या बहिणीला अटक झालीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close