पारस्करांना तात्पुरता दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर

July 25, 2014 10:13 PM0 commentsViews: 678

sunil+parskar25 जुलै : तरुणी वरील बलात्कार प्रकरणातील आरोपी आयपीएस अधिकारी सुनील पारसकर यांनी आज आपली अटक टाळण्यासाठी मुंबई सेशन कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली. कोर्टाने पारस्कररांना तात्पुरता दिलासा देत 31 जुलैपर्यंत अटक करु नये असे आदेश दिले आहे.

तरुणीच्या जबाबात अनेक धक्कादायक माहिती पुढे येत आहे. संबधीत आयपीएस अधिकारी एकदा त्या तरुणीस नवी मुंबई येथील त्यांच्या फ्लॅटवर घेऊन गेला होता. त्यावेळी हा फ्लॅट आपल्याला भाड्याने द्यायचा आहे, असं म्हणाला होता. यावेळी आयपीएस अधिकार्‍यांने आपल्या विनयभंग केला असं या तरुणीचं म्हणणं आहे. तसंच त्यानंतर एकदा आपल्याला हॉटेलमध्ये नेऊन बलात्कार केल्याचं तक्रारीत म्हटलंय.

आयपीएस अधिकारी सुनील पारसकर यांच्या विरोधात शुक्रवारी बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दााखल झाला आहे. त्यांच्यावर 376(2) , 376 (क) आणि 354 (ड) या कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. ही सर्व कलम गंभीर स्वरुपाची आहे. त्यामुळे पासरकर यांनी तात्काळ कोर्टात अटक पूर्व जामिनासाठी धाव घेतली. त्यांनी आज मुंबई सेशन कोर्टात आपल्या वकिलामार्फत अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला. त्यांच्या अटकपूर्व जामिन अर्जावर आता 31 जुलैनंतर सुनावणी होणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close