राष्ट्रवादीला 125 जागा देण्याची काँग्रेसची तयारी ?

July 25, 2014 11:24 PM0 commentsViews: 2106

35pawar_cm_ncp25 जुलै : विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपावरून आघाडी आणि युती दोघांमध्येही कुरुबुरी सुरू झाल्या आहेत. आघाडीत राष्ट्रवादीने 144 जागांची मागणी केलीय. पण राष्ट्रवादीला जास्तीत जास्त 125 जागा देण्याची काँग्रेसची तयारी असल्याची सूत्रांची माहिती आहे. यापेक्षा जास्त जागा राष्ट्रवादीला देणार नाही, अशी काँग्रेसची भूमिका आहे. हा फॉर्म्युला मान्य नसेल तर राष्ट्रवादीनं स्वतंत्र लढावं अशी ठाम भूमिका काँग्रेसने घेतली आहे.

दरम्यान, जे स्वबळावर लढायची भाषा करतायत त्यांनी आधी आपलं बळ किती आहे ते तपासावं असा टोला गृहमंत्री आर आर पाटील यांनी काँग्रेसला लगावलाय. तर जागावाटपाबाबत कुणी काहीही काहीही सांगितलं तरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींच अंतिम निर्णय घेणार असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

विशेष म्हणजे राष्ट्रवादीने अगोदर आक्रमक भूमिका घेत 144 जागा द्या नाहीतर स्वबळावर लढू असा इशारा दिला होता. लोकसभेच्या वेळीही राष्ट्रवादीने दबावंतत्राचा वापर केला होता. मात्र यावेळी काँग्रेसने ‘जशाच तसे’ सूत्रं हाती घेतल्याचं दिसतंय. पुण्यात झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात राष्ट्रवादीला जास्त जागा मिळणार नाही. सन्मानपूर्वक जर जागावाटप होणार नसेल तर आघाडी होणार नाही असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं. आता उद्या शरद पवार यांनी जागावाटपाबाबत बैठक बोलावली आहे. त्यामुळे पवार काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close