राष्ट्रवादीची ‘टीकटीक’ वाढली, शरद पवारांनी बैठक बोलावली

July 26, 2014 12:56 PM1 commentViews: 2258

46pawar_vs_congress3426 जुलै : विधानसभेचे पडघम वाजायला सुरूवात झालीये पण आघाडीत जागावाटपावरुन बिघाडीचे चिन्ह आहे. काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादीला 144 जागा देणार नाही सन्मानने आघाडी नाहीतर स्वबळावर लढा अशी भीष्म प्रतिज्ञा केलीय. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता पसरलीय.

याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व बड्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची काँग्रेसबाबत काय रणनीती असावी, याबाबत या बैठकीत चर्चो होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीला जास्तीत जास्त 125 जागा देऊ अशी गर्जना काँग्रेसने केलीय, अशी सूत्रांची माहितीय त्यावरही आज पवार बोलण्याची शक्यता आहे.

जागावाटपावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये कुरबुरी सुरू झाल्यात. दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची ही आजची बैठक महत्त्वाची ठरू शकते. शरद पवार काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Pradipvasant Pawar

    gelya tin nivadnukanpasun hech chalale aahe, nanatatar basatat gaga lavun!

close