बळीराजाच्या डोळ्यात कुठे असू तर कुठे हसू !

July 26, 2014 2:12 PM0 commentsViews: 1296

6drought26 जुलै : राज्यात काही ठिकाणी पाऊस आहे तर काही ठिकाणी जमीन कोरडी पडलीय. बळीराजाशी निसर्गाचा हा क्रूर खेळ गेले अनेक दिवस सुरू आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गेले अनेक दिवस मुसळधार पाऊस पडत होता. यामुळे अनेक नद्यांनी पातळी ओलांडली आहे. तर काही छोट्या धरणांची दारंही उघडावी लागली आहेत.

तर दुसरीकडे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जास्त पाऊस झालेला नाहीये. उस्मानाबाद जिल्ह्यामधली अनेक धरणं कोरडी पडली आहेत आणि यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी पिकं पाण्याखाली गेली आहे. मुसळधार पावसाचा शेतीला तडाखा बसलाय. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम धोक्यात जातो की काय अशी चिंता शेतकर्‍यांना पडली आहे. पिकं पाण्याखाली गेल्यामुळे पिकांमध्ये रोग पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जळगावात शेतकर्‍यांच्या आत्मदहनाचा इशारा

जळगावमध्ये गेल्या दीड महिन्यापासून पावसाची वाट बघणार्‍या शेतकर्‍यांच्या डोळ्यात पावसानं पाणी आणलंय. अमळनेर तालुक्यात 20 गावांमध्ये 24 तासात 208 मिलीमीटर पाऊस झाल्याने 4 हजार हेक्टरवरील पिकं पाण्याखाली आलंय. 3 दिवस उलटूनही पंचनामा न
झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी तहसील कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रशासनाला इशारा दिला आहे. उन्हाळ्यात जागवलेला कापूस धोक्यात तर आलाच आहे, दुबार पेरणीच संकाट निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे या शेतकर्‍यांना दरवर्षीच संकटाला सामोर जाव लागतं, पंचनामा होतो मदतही मिळते पण आता मदत नको त्यामुळे शेतातील पाणी काढण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची शेतकरी मागणी करत आहे. पण त्याकडे मात्र राज्यकर्ते प्रशासन दुर्लक्ष करतंय
दरवर्षी महागडी बियाणे, खते वाया जातात यावर उपाययोजना केली जावी म्हणून शेतकर्‍यांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय.

लातूर, उस्मानाबादेत धरणांनी गाठला तळ

जुलै महिना संपत आला तरी उस्मानाबाद जिल्ह्यात फक्त 150 मिलीमीटर एवढाच पाऊस झाला आहे. या अपुर्‍या पावसामुळे आता धरणांनी तळ गाठलाय. जिल्यात 184 लघू व मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी तब्बल 74 प्रकल्प कोरडे पडले आहेत तर बाकीच्या 94 प्रकल्पातली पाणीपातळी जोत्याखाली आहे. जिल्यातील सगळ्यात मोठे धरणे म्हणून ओळख असणार्‍या सीना कोळेगाव धरण तर पाणी नसल्याने पूर्ण कोरडे पडलंय. बाकीच्या साठवण तलावात तर केवळ 4 टक्के पाणीसाठा आहे. लातूर व उस्मानाबादच्या सीमेवरती येणारे मांजरा धरण ही कोरडेच आहे. जिल्ह्यावर दाटून येणारे ढग बरसत नाहीत . हे पावसाचे नाही तर दुष्काळाचे संकेत देऊ लागले आहेत. आम्ही शेतात पेरणी तर पावसाच्या भरवश्यावर केली त्यान यंदाच्या साली ही हुलकावणी दिली म्हणून आम्ही शेताकडे जात नाहीत तर दुसरीकडे जनावरे चार्‍याची गरज असते म्हणून मोकळ्या पडलेल्या धरणात थोडेफार हिरवे दिसते इथे जनवारं जगवण्यासाठी यावे लागते अशी नाराजी शेतकरी व्यक्त करीत आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close