धनगर आरक्षण समितीचे सदस्य घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

July 26, 2014 12:17 PM0 commentsViews: 310

st_andolan26 जुलै : धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बारामतीत उपोषणाला बसणार्‍या 16 आंदोलकांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. काही उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडलीय. त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय. त्यामुळे आता आंदोलक आक्रमक झाले आहे.

आरक्षण कृती समितीचे नेते आज (शुक्रवारी) रात्री मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत. घटनेनुसार आरक्षण द्या, त्याचा जीआर बारामतीत येऊ द्या, अशी या कृती समितीची मागणी आहे. ही मागणी पूर्ण झाली नाही तर रविवारपासून आंदोलनाची दिशा बदलण्याचा इशारा कृती समितीने दिलाय.

जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, औरंगाबादमध्ये धनगर समाज कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close