कारगिल विजय दिवस

July 26, 2014 4:02 PM0 commentsViews: 65

26 जुलै : 1999 च्या कारगिल युद्धाला आज 15 वर्षं पूर्ण होत आहे. ‘कारगिल विजय दिवस’ या नावानं आज कारगिल युद्धातील शहिदांचं स्मरण केलं जातं. 1999 साली 73 दिवस चाललेल्या युद्धानंतर पाकिस्ताननं कब्जात घेतलेला भूभाग भारतीय सैनिकांनी शौर्याची परिसीमा दाखवत परत मिळवला होता. गुरुवारीच लष्करप्रमुख जनरल बिक्रम सिंग यांनी लडाखच्या द्रासमध्ये युद्धस्मारकावर शहिदांना श्रद्धांजली वाहिली. आज दिल्लीच्या इंडिया गेटवर ‘अमर जवान ज्योती’वर शहिदांना आदरांजली वाहिली जाईल. तिथं संरक्षण मंत्री अरुण जेटली आणि तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख हजर असतील.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close