कर्नाटकची तहान भागवणार महाराष्ट्र

May 4, 2009 7:53 AM0 commentsViews: 6

4 मे कर्नाटकमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्यानं महाराष्ट्रच्या वारणा धरणातून कृष्णा नदीद्वारे दीड टीएमसी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. यावरून महाराष्ट्र आणि कर्नाटकातला पाणी प्रश्न गाजत असताना महाराष्ट्रच कर्नाटकाची तहान भागवणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. कर्नाटक मध्ये सध्या तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. कर्नाटकातल्या बागलकोट जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची जास्त टंचाई जाणवतेय. महाराष्ट्रातल्या वारणा धरणातील पाणी कृष्णा नदीतून कर्नाटकला पुरवण्यात येणारेय. येत्या तीन दिवसात हे पाणी कर्नाटकात पोहोचून तिथला पाणी प्रश्न सुटणार आहे. याआधी कोयनेतूनही दीड टीएमसी पाणी सोडण्यात आलं आहे. कर्नाटक आता उन्हाळ्यात आपली तहान भागवण्यासाठी पाण्याची मागणी महाराष्ट्राकडे करत आहे. मात्र पावसाळ्यात याच कर्नाटकने कृष्णेचं पाणी अडविल्यानं, कोल्हापूर ,सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गावांना पुराचा मोठा फटका बसला होता. पण आता ' कृष्णातून पाणी सोडण्यात येणार असल्याचं ' मुख्यमंत्र्यी अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.

close