‘नाद खुळा’, कोल्हापूरच्या गणेश माळीने पटकावले ब्राँझ मेडल

July 26, 2014 7:28 PM0 commentsViews: 692

26 जुलै : कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने धडाक्यात सुरुवात केलीय. आतापर्यंत भारतीय खेळाडूंकडून मेडलची लयलूट सुरूच आहे. पण या कॉमनवेल्थ गेम्समध्ये कोल्हापूरच्या गड्याने महाराष्ट्राची मान उंचावली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गणेश माळीनं 56 किलो वजनीगटात वेटलिफ्टिंगमध्ये ब्राँझ मेडल पटकावलं आहे. त्याच्या या कामगिरीमुळे कष्टकरी आईवडिलांच्या आनंद आता ओसंडून वाहतोय. आमच्यासाठी आकाश ठेंगण झालं अशी प्रतिक्रिया गणेशचे वडिल चंद्रकांत माळी यांनी दिली. तर आपल्या शिष्याने यश संपादन केलं हीच मोठी गुरुदक्षिणा आहे अशी भावना गणेशचे प्रशिक्षक प्रदीप पाटील यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे गणेश हा सर्वसामान्य घरातला आणि कोणतीही सरकारी मदत न घेता स्वतःच्या कष्टाने गणेशनं हे यश मिळवल्यानं आता त्याचं कौतुक होतंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close