‘दाभोळकरांचे भूत’ नाटकाला सेन्सॉर बोर्डाने नाकारली परवानगी

July 26, 2014 7:12 PM0 commentsViews: 401

dabholkar_drama26 जुलै : डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या जीवनप्रवासावर ‘दाभोळकरांचे भूत’ या नाटकाला सेन्सॉर बोर्डातील सदस्यांनी बहुमताने ग्रीन सिग्नल दिला असतांनाही फक्त एका सदस्याने आक्षेप घेतल्याने नाटकाला सेन्सॉर प्रमाणपत्र मिळू शकले नाही.

रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष राम जाधव यांनी केवळ एका सदस्याच्या आक्षेपावरुन ‘दाभोळकरांचे भूत’ हे सामाजिक नाटक रोखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सेन्सॉर बोर्डाने नाटकातील 118 कट आहेत.

त्यामुळे या कटनंतर फक्त 26 वाक्य शिल्लक राहतील असे नाटकाचे दिग्दर्शक श्याम पेठकर यांनी सांगितले आहे. या नाटकात समाजविरोधी काहीही नाही त्यामुळे परवानगी का नाकारण्यात येत आहे. यासंदर्भात आश्चर्य व्यक्त होत आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close